शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एवढे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे, जे शेतकरी दरवर्षी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतर अनुदानास शेतकरी पात्र ठरणार आहे. जे शेतकरी पिक कर्जाची परतफेड दरवर्षी नियमितपणे करतात असे शेतकरी योजनेच्या माध्यमातून पात्र ठरू शकणार आहे व त्या संबंधित शेतकऱ्यांची निवड सुद्धा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून पात्र ठरविण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रोत्साहन पर अनुदान मिळवण्यासाठी ई केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे या योजनेचा लाभ सुद्धा त्यांना दिला जाणार नाही अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी असून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खालील दिलेल्या प्रोसेस नुसार केवायसी करून घ्यावी. त्यामुळे प्रोत्साहन पर अनुदान मिळण्यास सुलभता निर्माण होईल.
ई केवायसी प्रोसेस
सर्वप्रथम ई केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटरवर जावे सीएससी सेंटरधारकांनी लॉगिन करावे त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना निवडावी, त्यानंतर केवायसी करण्यासाठी दोन पर्याय दिले जातील त्यामधील विशिष्ट क्रमांक व आधार कार्ड क्रमांक या दोन पैकी एक क्रमांक टाकून सर्च बटन दाबा, त्यानंतर विविध प्रकारची माहिती विचारली जाईल ती माहिती भरा माहिती खरी असेल तर येस असे निवडा. त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी प्रविष्ट करावा लागेल तसेच ई केवायसी हे ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल व अशाप्रकारे केवायसी ची प्रक्रिया वरील प्रमाणे पूर्ण होईल त्यानंतर केवायसी पूर्ण झाल्याची प्रिंट काढून शेतकऱ्यांनी आपल्याकडे ठेवावी अशाप्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन वर पन्नास हजार रुपये अनुदान मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे