देशामध्ये विविध प्रकारच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी घरकुलाच्या योजना राबविल्या जातात, जसे की रमाई घरकुल आवास योजना, मोदी घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना अशा प्रकारे इतरही घरकुलाच्या योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आतापर्यंत लाभ दिला गेलेला आहे, तसेच अनेकांच्या खात्यावर पहिला हप्ता सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे.
शासनाच्या माध्यमातून अशा हप्ता वितरित झालेल्या नागरिकांनी बांधकाम चालू केलेले असणे महत्त्वाचे आहे, कारण ही घरकुल लाभार्थ्यांची बांधकामाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इतरही नागरिकांना पुढील टप्प्यांमध्ये घरकुले दिली जातात त्यामुळे पहिल्याच टप्प्यातील नागरिकांनी घरकुले लवकर पूर्ण न केल्यास पुढील लाभार्थ्याला उशिरा लाभ मिळू शकतो त्यामुळे अशा लाभार्थ्याला लवकरात लवकर घरकुल बांधण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे.
घरकुल लाभार्थ्यांना गटविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटिसा पाठवल्या जात आहे, की येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये त्यांनी घरकुलाचे बांधकाम चालू करावे कारण अनेक नागरिकांना पहिला हप्ता वितरित झालेला असून काहीजणांना ज्यांनी बांधकामाला सुरुवात केलेली आहे, अशांना दुसरा व तिसरा तसेच चौथा सुद्धा हप्ता वितरित झालेला आहे, त्यामुळे अशा स्थितीमध्ये लवकरात लवकर घरकूल बांधकाम करणे गरजेचे आहे.
डीआरडीए ने दिलेल्या माहितीनुसार घरकुल लाभार्थ्यांनी जुलैच्या अखेरपर्यंत आपले बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्यांना घरकुलाच्या हप्त्याचे मिळालेले पैसे वसूल केले जाईल, म्हणजेच त्यांना पैसे वापस करावे लागणार आहे, अशा प्रकारची स्थिती आता घरकूल लाभार्थ्यांची होऊन बसलेली आहे, त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुलाचे बांधकाम चालू करणे गरजेचे आहे.
माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत, बारावी पास ते पदवीधरांना मिळणार 6 हजार ते 10 हजार रुपये