राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अनेक महिला बारावी पास असतात, त्यांना नोकरी मिळावी या प्रतीक्षेमध्ये असतात, तसेच नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात, अशाच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून अंगणवाडी मदतनीस भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती दरम्यान राज्यातील महिला अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे, तसेच अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून ज्या महिला भरतीसाठी इच्छुक असतील अशांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया येत्या काही दिवसातच पूर्ण करावी लागणार आहे.
राज्यातील सिंधुदुर्ग अंगणवाडी विभागामध्ये ही भरती केली जाणार असून, एकूण 4 जागांची भरती या दरम्यान केली जाणार आहे, या भरतीसाठी फक्त महिला अर्ज करू शकणार आहे, पुरुषांना अर्ज करता येणार नाही त्यामुळेच महिलांसाठीही अत्यंत सुवर्णसंधी सुद्धा ठरू शकते, तसेच भरतीनंतर ज्या महिलेची निवड केली जाईल अशा महिलांना सिंधुदुर्ग विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे.
ज्या महिलांना अर्ज करायचा असेल अशा महिलांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे अशा वयोगटातील असावे. तसेच भरतीची प्रक्रिया ही कोणत्याही परीक्षेशिवाय म्हणजेच फक्त मुलाखती वरच केली जाणार आहे, त्यामुळे अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करावी लागेल त्यानंतर मुलाखतीमध्ये ज्या महिलांची निवड होईल अशा महिला भरतीस पात्र ठरतील. महिलांना अर्ज करत असताना काही आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडावी लागणार आहे, 26 जुलै 2024 या तारखेपर्यंत अर्ज ऑफलाइन पद्धतीने जमा करावा.
अर्ज करताना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, उमेदवाराची स्वाक्षरी, एम एस सी आय टी प्रमाणपत्र त्यासह इतरही काही आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना अर्ज सोबत जोडावी. अर्ज पाठविण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी),रत्नागिरी सिंधुदुर्ग,कुलकर्णी कंपाऊंड,जेल रोड रत्नागिरी,जि.रत्नागिरी या पत्त्यावर पाठवायचा आहे.