राज्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, अशा बांधकाम कामगारांना चांगल्या प्रकारे सुविधा प्राप्त व्हाव्यात यामुळे शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना विविध प्रकारच्या सुविधा बांधकाम कामगारांना उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच बांधकाम कामगार योजना सुद्धा मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात अशातच आता बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संच दिला जाणार आहे, या भांड्याचा संचासाठी त्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
राज्यातील जे नागरिक नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल अशांना मोफत भांड्याचा संच दिला जाणार आहे, बांधकाम कामगारांना एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करावे लागत असल्याने, त्यांना गृह उपयोगी असणाऱ्या भांड्यांचा संच उपलब्ध करून देण्याचा एक प्रकारचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे, तसेच अनेक बांधकाम कामगारांना तीस भांड्यांचा संच वाटप करण्यात आलेला आहे, तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला सुद्धा या 30 भांड्याचा संचाचा लाभ घेता येईल.
अर्ज करत असताना बांधकाम कामगारांकडे आवश्यक काही कागदपत्रे उपलब्ध असावी लागणार आहे, त्यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी दाखला, लेबर कार्ड, रेशन कार्ड, एक रुपयात पेमेंट केल्याची पावती अशाप्रकारे संपूर्ण कागदपत्रे बांधकाम कामगाराकडे अर्ज करत असताना उपलब्ध असावी. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज करता येणार आहे, अशा प्रकारे बांधकाम कामगारांना मोफत भांड्याचा संच दिला जाईल.
कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला बजेट