राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी खरीप हंगाम 2023 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी केलेली आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणून त्यात पडलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेती पिकांचे दर शेवटपर्यंत घसरूनच राहिलेले होते, त्यामुळे अत्यंत कमी दर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळालेला आहे, सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये कापसाचे विक्री केली, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीवरील केलेला खर्च सुद्धा निघालेला नाही.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार असल्याचे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही जर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, कोणते शेतकरी पात्र असेल त्यामध्ये काही अटी आहेत का? तर त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली होती. व ई पिक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.
शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पुरवल्या जात आहे, अशातील एक सुविधा म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने सातबारा वर आपल्या पिकांची पाहणी करता येते, त्यामध्येही ॲप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतामधून थेट आपल्या सातबारावर हंगामातील पिकांचे क्षेत्र व कोणते पीक घेतलेले आहे, याची नोंदणी करता येते अशा पद्धतीने 2023 च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची ई पीक पाहणी केलेली होती, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये च्या मर्यादेमध्ये दोन हेक्टरच्या मर्यादेने अनुदान दिले जाईल.
महिलांना मिळणार उद्योगिनी योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासह 30 टक्के अनुदान, लगेच अर्ज करा