राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, एक जुलै 2024 पासून या योजनेची अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून, महिलांना केव्हाही अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, कारण यासंबंधी अर्ज करण्याची कोणतीही एक शेवटची तारीख नाही, ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली होती, व त्यांना मोबाईलवर एक प्रकारचे मेसेज आले होते की आपला अर्ज मंजूर झालेला आहे, अशा महिलांना जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे असे एकूण मिळून तीन हजार रुपये मिळणे चालू झालेले आहे.
राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले असून, ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही अशांनी आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे की नाही हे चेक करावे जर बँक खाते आधार कार्ड ला लिंक असेल तर महिलांना 17 तारखेपर्यंत 3 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही कारण महिलांना आपला अर्ज मंजूर झालेला आहे असं पाठवण्यात आलेले असल्याने अशा महिलांच्या खात्यावर सतरा तारखेपर्यंत तीन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेचे बँक खाते डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे, ज्या महिलांच्या खात्यावर 3000 जमा झाले नाही, आपले बँक खाते चेक करून बघावे कारण व पुढील दोन दिवसा मध्ये सर्व महिलांना तीन हजार रुपये रक्षाबंधन चे एक प्रकारे बहिणीला गिफ्ट जात आहे. 14 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना रक्षाबंधन चे 17 तारखेपर्यंत गिफ्ट शासनाच्या माध्यमातून दिले जात आहे.