सध्याच्या स्थितीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु ही कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नसून तेलंगणा राज्यातील सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी आहे, म्हणजेच या कर्जमाफीचा लाभ तेलंगणातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशाप्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे एक प्रकारचा असलेला बोजा कमी होण्यास मदत होणार आहे, या निर्णयामुळे तेलंगणा राज्यातील लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल व शेतकरी नव्याने आपले शेतीची कामे जोमाने करतील कारण त्यांच्यावर असलेला कर्जाचा भार कर्जमाफीमुळे कमी होणार आहे.
शेतकरी शेती करत असताना कर्ज घेतात परंतु शेती चांगल्या प्रमाणात पिकत नसल्याने नैसर्गिक संकट येत असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याने अशा विविध कारणांनी शेती पिकांचे मोठे नुकसान होते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना तोटा बघायला मिळतो, शेतीतून काहीही उरत नाही परंतु घेतलेले शेतीवरील कर्ज त्याच्या व्याजामध्ये शेतकरी बुडतो त्यामुळेच तेलंगणात सरकारने घेतलेला हा निर्णय तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.
तेलंगणा राज्यातील जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे, त्यामुळे कर्जाच्या बोजातून जवळपास चार लाख शेतकरी मुक्त होणार आहे, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी जवळपास 5644.24 कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे व या तेलंगणा सरकारच्या निर्णयामुळे इतर राज्य सुद्धा अशा प्रकारच्या योजना इतर राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अशाच प्रकारे कर्जापासून दिलासा मिळेल.