महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस पिकाची लागवड केली जाते, महाराष्ट्रामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते पिक घेत असताना मोठ्या अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते अशा स्थितीमध्ये एक अडचण म्हणजेच कापुस पिकाची होणारी पातेगळ थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकाची लागवड करत असताना, व कापूस पिकाच्या वानाची निवड करत असताना मोठ्या प्रमाणात चुका केल्या जातात त्यामुळेच शेतकऱ्यांना विविध अडचणीला सामोरे जावे लागते.
लागवड करत असताना खूप जवळ लागवड करू नये योग्य अंतर दोन झाडामधील ठेवणे आवश्यक आहे तसेच वानानुसार जागेचे अंतर ठरवावे, कापूस पिकाच्या वाढीचा कालावधीमध्ये खूप वाढ न होऊ देता वाढ थांबवणाऱ्या औषधाचा उपयोग करावा, त्यामुळे अन्नाचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा चांगल्या प्रमाणात करता येतील परंतु जर खूपच वाढलेली असेल तर अशा स्थितीत प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही व पातेगळीला सामोरे जावे लागते.
तसेच मागील काही दिवसांपासून शेतीला पाण्याचा पुरवठा झालेला नसेल म्हणजेच वातावरण कोरडे असेल व अचानकच एकसारखा पाऊस लागून राहिला मात्र पातेगळीला सामोरे जावे लागते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पूर्वीपासूनच व्यवस्थापन करून ठेवणे आवश्यक आहे जास्त झाडांची वाढ ही होऊ देऊ नये, व आपण निवडलेल्या कपाशीनुसार त्या वानाची लागवड करत असताना योग्य अंतर ठेवावे अशा प्रकारचे व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी केली तर शेतकऱ्याला पातेगळीला सामोरे जावे लागणार नाही.