ज्येष्ठ नागरिकांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयोश्री योजना च्या माध्यमातून 3000 रुपये एवढी एक रक्कम देण्यात येणार आहे व मुख्यमंत्री वयोश्री योजनेची अर्ज प्रक्रिया सुद्धा चालू करण्यात आलेली असून योजने अंतर्गत लाभ घेऊ ईच्छीणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे व त्यानंतर जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एवढी रक्कम एक रकमी दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही एक अत्यंत महत्त्वाची योजना असून यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही म्हणजेच कोणतेही प्रकारच्या बिमाऱ्याचा इलाज पैशातून करता येईल व उपकरणे सुद्धा विकत ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे अशा नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ मिळवावा मिळणाऱ्या तीन हजार रुपयांमधून ज्येष्ठ नागरिक आपल्याला हवी असणारी उपकरणे खरेदी करू शकणार आहेत, तसेच योजनेच्या माध्यमातून डीबीटी संलग्न असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांच्या खात्यावर पैशाची वितरण केले जाईल, तसेच अर्ज करत असताना ज्येष्ठ नागरिकाकडे काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असावी कारण अर्ज करताना अशा कागदपत्राला अर्जासोबत जोडावे लागणार आहे.
अर्ज या ठिकाणी
https://drive.google.com/file/d/1jCXfFcbuwWRGPahLqp93Nfdz1zl2oJ8w/view?usp=drivesdk
अर्ज करत असताना वरील दिलेला अर्ज प्रिंट काढून घ्यावा त्यासोबत आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, स्वयंघोषणापत्र अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे अर्जासोबत जोडावी त्यासोबतच अर्जामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य व सुटसुटीत अक्षरांमध्ये भरून तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या समाज कल्याण विभागामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत सहजरीत्या ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून वार्षिक एक रकमी तीन हजार रुपयांची रक्कम डीबीतटीच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये प्राप्त करता येणार आहे.