सर्वसामान्य नागरिकांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी कारण एक सप्टेंबर पासून अनेक नियमांमध्ये बदल केले जाणार आहे, व याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांना बघायला मिळू शकतो, त्यामध्ये मेसेजिंग तसेच कॉलिंग च्या नियमांमध्ये सुद्धा बदल होऊ शकतात त्यासोबतच गुगल प्ले स्टोअर मध्ये सुद्धा काही बदल केले जातील त्याबरोबरच आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया सुद्धा बघुयात आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर ही देण्यात आलेली आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड कसे अपडेट करायचे याची प्रक्रिया खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करूयात.
गुगल प्ले स्टोअर वरून एक सप्टेंबर ला अनेक प्रकारचे बदल होनार आहेत ते काढून टाकले जाणार आहेत, सध्याच्या स्थितीमध्ये गुगल प्ले स्टोअर वर असे अनेक ॲप आहेत ते अत्यंत कमी दर्जाचे ॲप असून त्यामध्ये फसवेगिरी सुद्धा होऊ शकते त्यामुळे गुगल प्ले स्टोअर वरून अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ॲप काढून टाकले जातील त्याचा परिणाम अनेक सर्वसामान्य नागरिकांना बघायला मिळणार आहे. एक सप्टेंबर पासून बँकिंग कॉल व ओटीपी येण्यास वेळ सुद्धा म्हणजेच विलंब सुद्धा लागू शकते.
ऑनलाइन पेमेंट ऑनलाइन बँकिंग यामध्ये सुद्धा थोडा वेळ किंवा थोडीशी अडचण एक सप्टेंबर रोजी पासून थोडी जाणवली जाऊ शकते, एक सप्टेंबर पासून अनेक प्रकारचे नवीन बदल केले जाणार आहे व ज्यांचे आधार कार्ड खूप जुने आहे दहा वर्षांपूर्वीची आहे अशांना 14 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करता येणार आहे, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पन्नास रुपये द्यावे लागणार आहे व अत्यंत सहज पद्धतीने आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांनी myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटला ओपन करावे लागणार आहे, त्यानंतर अपडेट आधार कार्ड हे ऑप्शन दिसेल ते ऑप्शन सिलेक्ट करा, त्यानंतर लॉगिन करायचे आहे त्यासाठी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल त्याबरोबरच मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी एंटर करावा लागणार आहे त्यानंतर तुम्ही लॉगिन व्हाल. त्यानंतर जे अपडेट करण्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करावे व सबमिट करावे. अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड अपडेटची स्थिती बघू शकता अत्यंत सहज पद्धतीने ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.