मागील काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे, काही भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतो आहे त्यामुळे अशा स्थितीविकांचे हजारो हेक्टर मध्ये नुकसान होत आहे, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडे शेती पिकाचे नुकसान झाल्याबाबतची तक्रार नोंदवणे आवश्यक आहे व हीच तक्रार विमा कंपनीकडे शेतकऱ्यांना कशाप्रकारे नोंदवता येणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना नुकसानी ची माहिती पिक विमा कंपनीला द्यावी लागते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला क्लेम करावा लागतो व पिक विमा कंपनीकडे अत्यंत सहजरीत्या तक्रार नोंदवली जाऊ शकते त्यामध्ये सर्वप्रथम क्रॉप इन्शुरन्स हे एप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये उघडा त्यानंतर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तक्रार नोंदवता येणार आहे त्यामध्ये कंटिन्यू एस गेस्ट हे ऑप्शन निवडा. क्रॉप लॉस हे ऑप्शन निवडून क्रॉप लॉस इंटीमेशन हे ऑप्शन नंतर निवडा.
त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक टाकून आलेला ओटीपी एंटर करा, कोणता हंगाम आहे तो निवडा त्यानंतर तुम्ही पिक विमा कुठून भरलेला आहे, त्यात सीएससी सेंटर असेल तर ते निवडा त्यानंतर पिक विम्याच्या पावतीवर असलेला नंबर टाकून पुढे जा, त्यानंतर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तर ती संपूर्ण माहिती ओपन होईल ज्या पिकाचे नुकसान झाले असेल त्या पिकाबद्दल ची माहिती निवडा नुकसान कशामुळे झालेले आहे ते निवडून पिकाचा फोटो काढा व सबमिट करा अशा पद्धतीने पीक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्याला पाठवता येईल.
एवढी सर्व प्रक्रिया जर शेतकऱ्याला करता येत नसेल तर सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजेच हेल्पलाइन क्रमांकावर कृषी विभागांमध्ये कॉल करून सुद्धा शेतकऱ्याला आपल्या पिकाचे झालेल्या नुकसानीची नोंदणी करता येणार आहे त्यामुळे पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्याची पिकाची झालेली नुकसानीची माहिती पोहोचवली जाईल, 14447 हा टोल फ्री क्रमांक शेतकरी वापरून नुकसानीची माहिती देऊ शकतात.