राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जावे यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे, या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करण्यात आलेल्या आहे, या घोषणामुळे शेतकऱ्यांचे एक प्रकारे हीत साधले जावे त्यांचा विकास व्हावा अशा प्रकारचे उद्देश ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसह इतर कोणत्या घोषणा करण्यात आलेल्या आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
शेतकऱ्यांसाठी चा निर्णय घेण्यात आलेला असून अमरावती या ठिकाणी नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे, या निर्णयामुळे नवीन मत्स्य पालन क्षेत्रामध्ये विकास होणार आहे. शेगाव येथील असलेल्या सहकारी सूतगिरणीला मदत दिली जाणार आहे. यामुळे शेगावच्या आसपास असलेल्या भागातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठीचे एक प्रकारे स्थिर बाजार उपलब्ध होणार आहे, अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधले जाईल.
शेती करत असताना शेतकऱ्यांना शेतीत अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजेच पाण्याची व्यवस्था शेतीमध्ये विहीर किंवा बोरवेलच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक करून शेतीला पाणी दिले जाते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता विहीर शेततळे व विज जोडणी साठी अधिकचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या बाबतीतील निर्णय घेण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त सुद्धा इतरही सामाजिक प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे.
केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या 7 योजनांसाठी 14,235 कोटी रुपये खर्चास मंजुरी