महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे हित साधले जावे याकरिता विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहे त्यातीलच एक प्रयत्न व तरुणांना रोजगारही यातून मिळणार आहे व सर्वसामान्यांना शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत दिली जाणार आहे, शासनाने मुख्यमंत्री योजना दूत योजना राबवली जाणार असल्याची माहिती दिलेली होती, व त्यानुसार आता जवळपास 50 हजार जागांची भरती केली जाणार आहे, यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे म्हणजेच नोकरी करता येणार आहे तसेच किती रुपये पगार त्या निवड झालेल्या व्यक्तीला मिळेल तसेच योजना दूत अंतर्गत अर्ज कुठे करावा? पात्रता आवश्यक कागदपत्रे अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
राज्यामध्ये विविध प्रकारच्या योजना शासनाच्या माध्यमातून शेतकरी सर्वसामान्य विद्यार्थी अशांसाठी राबवल्या जातात परंतु अशा सर्व योजनांची माहिती सर्वसामान्यांना नाही त्यामुळे अशा सर्व योजनांबद्दलची माहिती सर्वसामान्य नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता राज्यात मुख्यमंत्री योजना दूत राबवली जात आहे, नागरिकांची निवड केली जाईल ज्यांना योजना दूत अंतर्गत नोकरी मिळवायची आहे अशांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे योजना दूत च्या माध्यमातून दहा हजार रुपये प्रति महिना अशा प्रकारचे वेतन दिले जाईल, व अशाच पन्नास हजार योजनादूतांची निवड केली जाणार आहे.
योजनेमध्ये ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल अशांना काही आवश्यक माहिती पात्रता माहिती असणे गरजेचे आहे त्यामध्ये व्यक्ती पदवीधर असावा 18 ते 35 वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक, व्यक्तीला संगणकाचे ज्ञान असावे स्वतःकडे स्मार्टफोन असावा, व्यक्तीचे बँक खाते आधार संलग्न असावे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध असावे अशा प्रकारच्या पात्रता असेल, 13 तारखे पर्यंत अर्ज करता येणार आहे, आवश्यक कागदपत्रे सुद्धा लागणार आहे.
अर्ज करत असताना अर्ज प्रक्रिया http://www.mahayojanadoot.org/या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे नोंदणी करावी लागेल नंतर अर्ज प्रक्रिया करताना आधार कार्ड, बँक खात्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, अधीवास प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे अर्ज करत असताना आवश्यक आहे वरील दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीन अनुदान, शेतकऱ्यांनो तुम्हाला किती रुपये मिळणार?