दरवर्षी शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात, त्यामुळे अशा प्रकारच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती दुष्काळ सदृश्य परिस्थिती तसेच इतर नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, अशा प्रकारच्या नुकसानीला भरपाई मिळावी याकरिता शेतकऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी पिक विमा उतरविला जातो, पिक विमा उतरवल्यानंतर ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे असते कारण, की पिक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील असलेल्या पिकांची नोंदणी थेट शेतकऱ्यांच्या सातबारावर केली जाते त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आतापर्यंत करून घेतलेली नसेल अशांनी लवकरात लवकर पूर्ण करावी.
ई पीक पाहणी आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे ही पीक पाहणी करण्यासाठी अत्यंत सहज पद्धत उपलब्ध करून देण्यात आलेली असून, ई पिक पाहणी या ॲपद्वारे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार आहे. ओपन करून मोबाईल क्रमांक महसूल क्रमांक म्हणजेच अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरून कोणत्या पिकाची किती क्षेत्रामध्ये पाहणी केलेली आहे, अशी संपूर्ण माहिती नोंदवल्यानंतर या माहितीची नोंद सातबारावर होते व अशा प्रकारची ई पीक पाहणी शेतकऱ्यांना करावी लागते.
शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, व याच मुदतीनंतर मात्र अनेक शेतकरी पाहणी करण्यापासून वंचित असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नवीन चान्स देण्यात आलेला असून 23 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करता येणार आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाही अशांनी 23 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावी कारण ई पीक पाहणी केली तरच शेतकऱ्यांना पिक विमा तसेच दुष्काळी अनुदान व विविध प्रकारचे अनुदान ई पीक पाहणी व नोंदवलेल्या पिकांनुसार दिले जाईल, त्यामुळे ई पीक पाहणी पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सप्टेंबरच्या या तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासात सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज