देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत मागील काही दिवसांपूर्वी देशात पीएम सूर्य घर मोफत वीज योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिक लाभ घेऊ शकतो व यामुळे या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांनी चांगला प्रतिसाद नोंदवलेला आहे, योजनेच्या माध्यमातून आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावली जातील त्यानंतर घरामध्ये त्या द्वारा मोफत विजेच्या संचार होईल म्हणजेच नागरिकांना पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार आहे. पूर्वीचे मोठ्या संख्येने येणारे वीज बिल आता कमी होईल परंतु यासाठी पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सोलार पॅनल लावून योजनेचा लाभ घ्यावा.
पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून किलोवॅटनुसार अनुदान दिले जाते, व हे अनुदान अर्ज केल्यापासून व लाभार्थ्याची निवड झाल्यापासून साधारणता एक महिना किंवा जास्त कालावधी झाल्यानंतर दिले जात होते परंतु आता या योजनेच्या माध्यमातून मोठा बदल करण्यात आलेला आहे, आता शासनाच्या माध्यमातून पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांना अगदी सात दिवसाच्या कालावधीमध्ये अनुदानाची वितरण केले जाईल त्यामुळे लवकरात लवकर लाभ नागरिकांना मिळेल.
आतापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी योजनेच्या माध्यमातून नोंदणी केलेली आहे, दोन किलो वॅटच्या सौर प्रणालीसाठी 30 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाईल, तीन किलो वॅटच्या सौर प्रणालीसाठी 48 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाईल, तीन किलो वॅट पेक्षा जास्त सौर प्रणालीसाठी 78 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाईल. व अर्ज प्रक्रिया करायची असेल तर https://www.pmsuryaghar.gov.in/या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी.