राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या असून शेती करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजेच शेतीला पाण्याची उपलब्धता असणे, शेती करताना पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकरी चांगल्या प्रमाणात ओलिताचे उत्पन्न सुद्धा काढू शकतो, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता नसल्याने शासनाने शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे, पूर्वी ही योजना नसल्याने विजेच्या अन उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे कठीण होऊन बसलेली होते अशा स्थितीत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शासनाच्या माध्यमातून राज्यात चालू करण्यात आलेली आहे.
त्यामुळे राज्यात राबवल्या जाणाऱ्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत असणारी पात्रता काय आहे? कोणते शेतकरी यात पात्र ठरतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार कोणत्या प्रकारचा सौर कृषी पंप दिला जाणार तसेच कागदपत्रे, अर्ज करण्यासाठी कोणती लागतील अर्ज प्रक्रिया अशा प्रकारची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे, त्यामुळे खालील प्रमाणे संपूर्ण पात्रतानिकष जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे व त्या जमीनुसार किती एचपी पंप दिला जावा याचा विचार करून कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी एचपी चा पंप व अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजेच पाच एकापेक्षा जास्त जमीन असेल तर साडेसात एचपी चा पंप अशा प्रकारे दिला जाईल.शेतकऱ्यांना शेतीला पाणी देत असताना विजेची आवश्यकता असते त्यामुळे अनेक वेळा लोड शीडिंग मुळे शेतकऱ्याला वेळेवर आपल्या शेतीला पाणी देणे शक्य होत नाही त्यामुळे आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप द्वारे दिवसा कोणत्याही वेळेला शेतीला पाण्याचा पुरवठा शेतकरी करू शकतील.
योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना पूर्ण करावा लागतो व अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना आवश्यक कागदपत्रे लागतात, त्यामध्ये आधार कार्ड, शेतीचा सातबारा, सातबारावर विहीर बोरवेल किंवा कोणत्याही पाण्याच्या स्त्रोतांची नोंद असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला, मोबाईल क्रमांक ई-मेल ऍड्रेस अशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे लागतील तसेच https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.
शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवले, तेलाच्या किमतीत एवढ्या रुपयांची वाढ