राज्यामध्ये महामेष योजना राबवली जाते, परंतु ही योजना इथून पुढे अधिक प्रभावीपणे राबवण्यास शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे महामेष योजनेअंतर्गत विविध प्रकारचे अनुदान मोठ्या प्रमाणात दिले जाणार असून योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर लगेच शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण येत्या काही दिवसातच अर्ज प्रक्रियेची तारीख संपेल त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्यास इच्छुकांनी महामेष योजनेचा अर्ज भरावा.
महामेष योजनेअंतर्गत कुक्कुट पालनासाठी पक्षांच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात महामेष योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला अनुदान दिले जाणार आहे, मेंढी व शेळी पालनासाठी जागा खरेदीसाठी अनुदान सुद्धा दिले जाईल त्याचप्रमाणे, मेंढ्यांच्या चराईसाठी चराई अनुदान सुद्धा दिले जाईल अशाप्रकारे महामेष योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे परंतु यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
ज्यांना महामेष योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल अशा नागरिकांना 12 ते 26 सप्टेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे 26 सप्टेंबर ही महामेष योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.http://www.mahamesh.org/ या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया नागरिकांना पूर्ण करता येणार आहे प्रक्रिया अत्यंत सहजरीत्या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी.
महामेष योजनेच्या माध्यमातून मेंढपाळांनी मिळण्याच्या चराईचे अनुदान घेत असताना मेंढपाळाकडे किमान 20 मेंढ्या असणे आवश्यक आहे अशा मेंढपाळांना जून ते सप्टेंबर या कालावधीमधील प्रति महिन्याचा 4 हजार रुपये अशाप्रकारे चराई अनुदान दिले जाईल. अशाप्रकारे महामेष योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.