महाराष्ट्र शिक्षक परीक्षेसाठीचे अर्ज चालू झालेले असून अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेच्या नंतर विविध प्रकारच्या पदासाठी नियुक्ती नवीन शिक्षकांची केली जाईल व त्यासाठी सर्वप्रथम अर्ज प्रक्रिया पूर्ण करून, घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये पात्र ठरावे लागणार आहे, उमेदवारांचे परीक्षेद्वारा सिलेक्शन केले जाईल अशांना खालील प्रमाणे देण्यात आलेल्या पदांवर नियुक्ती करण्यात येईल त्यामुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषदेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असतात उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने तारखेच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्जाची तारीख जाहीर झालेली असून 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे जे उमेदवार अर्ज प्रक्रिया पूर्ण करतील व महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठी अर्ज करून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर च्या दरम्यान प्राप्त होणार आहेत. व हे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होईल त्याची प्रिंट काढणे आवश्यक असेल.
दिवसातून दोन वेळा पेपर होईल पहिला पेपर साडे दहा ते एक वाजेपर्यंत होईल तर दुसरा पेपर दोन ते साडेचार पर्यंत होईल, अशा पद्धतीने पेपर होणार आहे व 30 सप्टेंबर ही उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल म्हणजेच 30 सप्टेंबर या तारखेपर्यंत अर्ज करता येणार परंतु त्यानंतर मात्र अर्ज करता येणार नाही, अर्ज करण्यासाठी https://mahatet.in/Student/Registration ओपन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
महामेष योजने अंतर्गत मिळणार मोठ्या प्रमाणात अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू लगेच अशा पद्धतीने अर्ज करा