हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, राज्यातील विविध भागांमध्ये 20 ते 21 तारखेला चांगल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी तर काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस असू शकतो, मागील काही दिवसांपासून पावसाने सुट्टी मारलेली होती परंतु आता पुन्हा एकदा नव्याने पावसाने हजेरी लावलेली आहे.
हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तसेच कोणत्या भागामध्ये येलो अलर्ट आहे हे त्या त्या भागातील नागरिकांनी जाणून घेणे आवश्यक आहे, येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, यात मराठवाडा विदर्भ या भागांचा समावेश असून विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.
राज्यातील सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात काही जिल्ह्यात काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशा प्रकारचा अंदाज हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून वर्तवला आहे, अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, कारण पावसाने सुट्टी मारल्याने अनेक भागातील हलक्या जमिनीमध्ये पाण्याची आवश्यकता भासू लागली होती, अशा स्थितीत शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळेल. परंतु काढणीला आलेली पिके पावसामुळे बाधित होऊ शकतात.