सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याचे संकेत तसेच शासनाच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहे याचाच परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळत आहे, मागील वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला, कारण हमीभावापेक्षा तर कमीच परंतु खूपच कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागली व यामुळे सोयाबीनच्या पिकावर केलेला खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही.
व येणारा काळ हा निवडणुकीचा आहे विधानसभा निवडणुकीस अगदी काही दिवसात प्रारंभ होईल व त्यामुळे शेतकऱ्यांसाठीचा प्रयत्न शासन करत आहे, कारण याचाच परिणाम त्यांच्या मतदानावर सुद्धा पडू शकतो, शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब महिला शेतकरी यांच्यासाठी योजना राबविल्या जात आहे, महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन देऊ अशा प्रकारचे मत सुद्धा व्यक्त केले जात आहे याचाच परिणाम म्हणून सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झालेली दिसून येते.
मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीनला मिळत असलेला दर प्रतिक्विंटल चार हजार दोनशे रुपये एवढा होता, व याच भावामध्ये वाढ होऊन चार हजार पाचशे रुपये एवढा जर सोयाबीनला मिळताना दिसतो अर्थातच तीनशे रुपये एवढी वाढ सोयाबीनच्या दरामध्ये झालेली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेलाच्या मागणीचा विचार करायचा झाल्यास तेलाच्या मागणीमध्ये वाढ होत आहे याचाच परिणाम म्हणून सोयाबीनचे दर वाढू शकतात. व आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी सुद्धा वाढलेली आहे, अशा प्रकारे सोयाबीनच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते.