खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांची कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, त्यामध्ये जास्तीत जास्त कापूस व सोयाबीन या दोन पिकाचे अति नुकसान झालेले असल्याने, शेतकऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित होते, व शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार असे जाहीर करण्यात आलेले होते, त्यानंतर आता अनुदान देण्याबाबतची पाऊले उचलली जात आहे व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसातच अनुदान वितरित केले जाणार आहे, त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे, त्याचप्रमाणे हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिले जाईल म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचे दोन हेक्टर कापूस पीक असेल तर त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये कापूस पिकासाठी मिळेल तसेच सोयाबीन एक दोन हेक्टर असेल तर सोयाबीन साठीचे दहा हजार रुपये अशाप्रकारे हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठीच्या निर्णयास मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये मागेच मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या 26 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केली जाणार आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये असे अनुदान मिळेल. 4194 कोटी रुपयांचा निधी यासाठी लागणार आहे, त्यामुळे का राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी एपीक पाहणी केलेली होती अर्थातच ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस व सोयाबीन अशा पिकांची नोंद असेल अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान दिले जाईल, व हे अनुदान 26 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात हो9णार आहे.