झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चा निर्णय आहे त्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली असून गाईच्या दुधासाठी पूर्वी पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान दिले जात होते, व हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते अशाच स्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपस्थित असतानाd घेण्यात आलेला निर्णय म्हणजेच गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये न देता त्यामध्ये वाढ करून आता प्रतिलिटर 7 रुपये प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे.
एक ऑक्टोंबर या तारखेपासून दुधाला प्रति लिटर 28 रुपये एवढा दर देणे बंधनकारक असून यावर मिळणारे अनुदान म्हणजेच शेतकऱ्याला एकूण प्रति लिटर 35 रुपये प्रमाणे दूध विक्री केल्यानंतर मिळेल 28 रुपये एवढे दुधाचे दर व उर्वरित असलेले सात रुपये हे दुधाच्या अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाईल, दूध उत्पादकांच्या अनुदानात वाढ केल्याने या योजनेस 965 कोटीहून अधिक निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. व मान्यता देण्यात आलेली असल्याने आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या गाईच्या प्रति लिटर दुधावर सात रुपये एवढे अनुदान मिळू शकणार आहे.
प्रति लिटर 35 रुपये एवढा दर पुढेही राहतच राहणार आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक ऑक्टोंबर पासून 35 रुपये एवढा दर एकूण, मिळणारा दर व अनुदान मिळून मिळणार आहे. पूर्वी मात्र सर्व उत्पादक शेतकऱ्यांना 5 रू प्रति लिटर प्रमाणे अनुदान दिले जात होते, व आता यात दोन रुपये एवढे नव्यानात वाढ करण्यात आलेली असून आता मिळणारे अनुदान एक ऑक्टोबर पासून सात रुपये प्रति लिटर अशा प्रकारे दूध उत्पादन शेतकऱ्यां65 तीच्या खात्यावर पाठवले जाणार आहे यामुळे थोड्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य दूध उत्पादकांना मिळू शकेल.