राज्यामध्ये बांधकाम कामगार योजना राबवली जाते दरवर्षी या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा लाभ बांधकाम कामगार नोंदणीकृत असलेल्या नागरिकांना घेता येतो, त्यामुळे तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या साठी नोंदणी करण्यास पात्र आहात का नोंदणी करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच नोंदणी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची? तसेच बांधकाम कामगारांना कोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो? अशा प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया तसेच बांधकाम कामगारांना मिळणारा योजना अत्यंत महत्त्वाचे आहे.
बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो त्यामध्ये शैक्षणिक योजनेचा लाभ असून बांधकाम कामगाराच्या मुला मुलींना मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप दिल्या जाते, शैक्षणिक पात्रतेनुसार ही सोलरशिप योजना दिली जाते जेवढे जास्त शिक्षण तेवढे जास्तच स्कॉलरशिप देण्यात येईल त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा योजना सुद्धा राबवली जाते, आरोग्य विषयक योजनांचा लाभ दिला जाऊन आर्थिक योजनांचा सुद्धा लाभ दिला जातो, अशा प्रकारच्या संपूर्ण योजनांचा लाभ बांधकाम कामगाराला दिला जातो.
बांधकाम कामगार नोंदणी करत असताना त्यामधील काही पात्रतेच्या अटी आहे त्यामध्ये बांधकाम कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केलेले कामगार नोंदणी करू शकणार आहेत. नोंदणी करत असताना आवश्यक कागदपत्रे लागणार आहे त्यामध्ये, नोंदणी करू इच्छिणाऱ्या कामगारांचे आधार कार्ड, ओळखीचा पुरावा, रहिवासी दाखला, बँक पासबुक, वयाचा दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो अशा प्रकारची कागदपत्रे लागतील.
नोंदणी करण्यासाठी कामगारांनी https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/registration ओपन करून, डब्ल्यू एफ सी निवडून त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक एंटर करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. रजिस्ट्रेशन निवडून मध्ये वैयक्तिक इतर संपूर्ण प्रकारची विचारली गेलेली माहिती योग्य प्रकारे भरावी. वरील प्रमाणे देण्यात आलेली संपूर्ण कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारे अत्यंत सहजरीत्या नोंदणी करता येईल.
ट्रॅक्टर खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, योजनेविषयी माहिती व पात्रता विषयक निकष