मागील वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापूस व सोयाबीन या दोन पिकाचे नुकसान झालेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे अनुदान मिळावे अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांची होती त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला असून, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अशा प्रकारचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून अगदी काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये एवढे प्रती हेक्टरचे अनुदान वितरित केले जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस व सोयाबीन चे अनुदान 29 सप्टेंबर रोजी वितरित केले जाणार आहे, त्यामुळे या तारखेपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अथवा सीएससी सेंटरवर जाऊन लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांचे अनुदान जमा होईल.
शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी लवकरच आपल्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी आपले आधार कार्ड घेऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक तसेच आपला बायोमेट्रिक यावरून प्रक्रिया अगदी दोन मिनिटांमध्ये पूर्ण केली जाईल अशी दोन मिनिटांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकरी अनुदानास पात्र ठरतील.
बांधकाम कामगार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रोसेस, आवश्यक कागदपत्रे पात्रता व संपूर्ण माहिती