मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये भाग बदलत असा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो आहे, तसेच अनेक भागांमध्ये मागील दोन ते चार दिवसापासून पावसाने उघडी लावलेली आहे, त्यामुळे अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असून त्यामध्ये राज्यातील पाऊस उघडी देणार असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची बातमी असून येणाऱ्या या उघडीपीमुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेले सोयाबीनचे पीक सुखरूपरीत्या शेतकरी घरापर्यंत आणू शकेल कारण आता पावसाने उघडीप दिलेली आहे.
परंतु असा हवामान देत असतानाच ही उघडीप पुढील काही दिवसानंतर लागेल परंतु राज्यातील काही भागांमध्ये सोमवार व मंगळवारी या दिवशी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम, वर्धा, नागपूर या ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो. छत्रपती संभाजी नगर, जालना, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे.
राजस्थान मधून 23 सप्टेंबरला तसेच गुजरात मधून सुद्धा मान्सूनने माघार घेतलेली होती, अशाप्रकारे आता हवामान विभागाच्या माध्यमातून दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस उघडीत राहील परंतु येथे दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके येत्या उघडीपी मध्ये काढून घ्यावी. तसेच वातावरण बदलल्यास पिकाला झाकून ठेवण्याची सोय सुद्धा शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे त्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी मान्सून बाबतची असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रोसेस, आवश्यक कागदपत्रे पात्रता व संपूर्ण माहिती