राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण मागील काही दिवसांपासून राज्यातील रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे, त्यानुसार रेशन कार्डधारक नागरिकांना लवकरात लवकर आपल्या जवळील रेशन धान्य दुकानांमध्ये जाऊन त्या ठिकाणी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, प्रत्येक कुटुंबातील ज्या नागरिकांची नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असेल अशा सर्व रेशन कार्डधारक नागरिकांना रेशन कार्ड सोबत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, असे न केल्यास एक नोव्हेंबर पासून मोठा बदल करण्यात येईल व ज्यांनी केवायसी केलेली नाही अशांना रेशन धान्य मिळणे सुद्धा एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.
देशामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना रेशन धान्याचा पुरवठा केला जातो, कोरोना काळापासून मोठ्या संख्येने नागरिकांना मोफत रेशन धान्याचा सुद्धा लाभ दिला जात आहे, व हे मोफत रेशन धान्य अजून पर्यंत चालू आहे त्यामुळे अशा नागरिकांना तसेच शिधापत्रिका म्हणजेच सर्वच रेशन कार्ड धारक नागरिकांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, रेशन कार्ड मध्ये ज्या नागरिकांची नावे असतील त्या सर्वांनी आपले आधार कार्ड घेऊन रेशन धान्य दुकानांमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपली बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
आतापर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असून ज्या नागरिकांना अजूनही केवायसी प्रक्रियेची माहिती नसेल अशांनी लवकरात लवकर रेशन धान्य दुकानात जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा याचाच परिणाम म्हणून एक नोव्हेंबर पासून ज्यांनी केवायसी केलेली नाही अशा रेशन मिळणे बंद होईल, केवायसी प्रक्रिया ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून शासनाच्या माध्यमातून केवायसी प्रक्रियेच्या द्वारा जे नागरिक आता हयात नाहीत अशा नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी म्हणजेच अशा सर्वांची योग्य ती नोंद ठेवण्यासाठी ही व्यवस्थित प्रक्रिया पूर्ण केली जात आहे त्यामुळे तुम्ही रेशन धान्याचा लाभ पुढे घेऊन इच्छित असाल तर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.