खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कापूस व सोयाबीन या दोन पिकाला हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळालेला होता, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता 5000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती व त्याचप्रमाणे शासनाच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये अशाप्रकारे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे, त्यामुळे नेमके तुमच्या खात्यावर पैसे आलेले आहे की नाही शेतकऱ्यांनी लवकरात लवकर चेक करावे, कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे आले नसेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अनुदान येण्यासाठी ची प्रक्रिया पूर्ण करावी.
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नसतील असे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईलवरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा मोबाईल वरून करता येत नसेल तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक व सर्व माहिती देऊन अत्यंत कमी मिनिटांमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल ही प्रक्रिया पूर्ण करावी ज्यावेळी शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करतील अशावेळी शेतकऱ्यांच्या खांत्यावर अनुदानाचे वितरण होणार आहे त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब कापूस सोयाबीन अनुदान मिळण्यासाठीची आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीन अनुदानासाठी शेतकरी पात्र ठरलेले आहेत पात्र ठरून सुद्धा अगदी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस सोयाबीनचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे कारण शेतकरी कापूस व सोयाबीन अनुदानासाठी पात्र आहेत परंतु पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सीडिंग करून घेतलेले नाही, त्याचप्रमाणे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही शेतकऱ्यांना जर अनुदान हवे असेल तर शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित झालेले नाही त्यामुळे असे शेतकरी अनुदानास पात्र असून अशांनी ई केवायसी करावी.
1 नोव्हेंबर पासून या नागरिकांचे रेशन धान्य होणार बंद, लगेच सावध व्हा व ही प्रक्रिया पूर्ण करा