मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये वाढ होत चाललेली आहे, तसेच सध्याच्या स्थितीमध्ये किरकोळ बाजारामध्ये 60 रुपये ते 80 रुपये प्रति किलो अशा प्रकारचा कांद्याला दर मिळतो आहे व या कांद्याच्या दरामुळे सर्व मान्यांना कांदा घेऊन खाने सुद्धा कठीण होऊन बसलेले आहे, कारण 70 ते 80 रुपये किलोचा कांदा परवडत नाही आहे त्याच पद्धतीने दिवाळीच्या काळामध्ये कांद्याचे दर अजूनही वाढणार असल्याची शक्यता असून दिवाळीपर्यंत कांद्याच्या दरात तेजी राहणार आहे, मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर कमी होते परंतु दिवसेंदिवस आता कांद्याच्या दरात वाढ होताना दिसते आहे.
कोणत्या बाजार समितीमध्ये कोणकोणत्या भागात कशा प्रकारचा दर कांद्याला मिळालेला आहे? त्यामध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये कांदाला मिळालेला प्रतिक्विंटलचा दर 4580 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 4450 रुपये एवढा दर कांद्याला मिळताना दिसतो, पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेला दर 3800 रुपये एवढा होता, व सरासरी दर 3150 रुपये एवढा मिळाला. पिंपरी बाजार समिती या ठिकाणी कांद्याला सर्वसाधारण दर 4400 रुपये तर सर्वाधिक दर 4500 रुपये एवढा मिळालेला आहे.
छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळाला, 2600 रुपये एवढा सर्वसाधारण दर कांद्याला मिळालेला आहे, जुन्नर बाजार समितीमध्ये कांद्याला पाच हजार एकशे दहा रुपये एवढा दर मिळालेला असून सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये एवढा होता. अशाप्रकारे कांद्याला विविध बाजार समित्यांमध्ये वरील प्रमाणे दर मिळताना दिसतो,व दिवाळीपर्यंत अशा प्रकारचा कांद्याचा दर कायम राहणार आहे त्यामुळे ग्राहकांना जास्त भावातच कांद्याची खरेदी करावी लागेल.
शेतकऱ्यांना मिळणार विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान, या ठिकाणी करा अर्ज