देशामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या आहे परंतु प्रत्येक नागरिकाजवळ राहण्यासाठी पक्के घर उपलब्ध नाही अशा स्थितीमध्ये नागरिकांना पक्के स्वतःचे घर उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने देशांमध्ये विविध प्रकारच्या घरकुलाच्या योजना राबवल्या गेलेल्या आहे, या योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने लाभ घ्यायचा योजनेसाठी पात्रता कोणत्या? आवश्यक कागदपत्रे तसेच नागरिकांनी अर्ज प्रक्रिया कशी करावी, यासंबंधी संपूर्ण माहिती अनेक नागरिकांना नाही त्यामुळे अशाच नागरिकांसाठीचे महत्त्वाची बातमी संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
विविध प्रकारच्या घरकुलाच्या योजना देशांमध्ये राबवल्या जातात आवास योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना पक्के घर देण्याचे उद्देश ठेवण्यात आलेले आहे आतापर्यंत अनेक देशातील नागरिकांना आवास योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन स्वतःचे पक्के घर बनवण्याचे अनेक नागरिकांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे, तसेच यापुढेही मोठ्या संख्येने आवास योजनेमध्ये नागरिकांना लाभ दिला जाणार आहे, त्यामधील काही आवश्यक पात्रता आवश्यक कागदपत्रंची पूर्तता करणे आवश्यक असेल.
आवास योजनेची पात्रता म्हणजेच पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी यापूर्वी आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच पात्र लाभार्थ्याची पूर्वीचे पक्के घर नसावे, लाभार्थी भारताचा नागरिक असावा, यासोबतच काही आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी लाभ घेताना लागतील त्यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो अशाप्रकारे संपूर्ण आवश्यक कागदपत्रे आवास योजनेअंतर्गत लाभ घेत असताना लाभार्थ्याकडे उपलब्ध असावी.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे, अधिकृत संकेतस्थळ ओपन करून त्या ठिकाणी अर्ज ओपन झाल्यानंतर विचारली गेलेले संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागणार आहे त्यामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य भरून, वरील प्रमाणे देण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, पात्रता व निकषांमध्ये तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे, त्यानंतर संपूर्ण माहिती भरून कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा. अशाप्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने लाभ दिला जात आहे.
पीएम जनधन योजनेला दहा वर्षे पूर्ण, बघा काय आहे योजनेचे फायदे