देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक नागरिकांना आतापर्यंत पक्के घर देण्यात आलेले आहे, अंतर्गत ठेवण्यात आलेले उद्देश्य म्हणजेच सर्वसामान्य गरीब कुटुंबाला स्वतःचे पक्के घर प्राप्त व्हावे त्यासाठी अनुदान देणे हे आहे, त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक नागरिकांना म्हणजेच अनेक कुटुंबीयांना लाभ मिळालेला आहे परंतु त्यामध्ये काही अटी ठेवण्यात आलेल्या होत्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काही अटी ठेवल्या गेलेल्या असून त्या अटींमध्ये बसणारे नागरिक योजनेचा लाभ घेऊ शकत होते परंतु आता काही अटी रद्द करण्यात आलेल्या आहे म्हणजेच आता रद्द करण्यात आलेल्या अटीनुसार अनेक नागरिक प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र ठरून लाभ घेऊ शकणार आहेत.
अनेक नागरिकांना प्रश्न पडलेला असेल की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोणत्या अटी काढून टाकण्यात आलेले आहे त्यामध्ये ज्या नागरिकांच्या घरी फ्रीज आहे, दुचाकी वाहने आहेत, मोटर आधारित मासेमारीच्या बोटी, लँडलाईन फोन अशा प्रकारच्या वस्तू ज्या नागरिकांकडे म्हणजे ज्या कुटुंबात असतील अशा कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जात नव्हता परंतु आता या अटी काढून अशा नागरिकांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ज्या कुटुंबातील नागरिकांचे मासीक उत्पन्न पंधरा हजारापेक्षा कमी असेल अशा नागरिकांना अर्ज करता येईल.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एक लाख वीस हजार रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते, तर डोंगराळ भागातील नागरिकांना दहा हजार रुपये जास्त एवढी मदत केली जाते, व अशाच नागरिकांना आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असलेल्या नागरिकांना हप्ता आता लवकरच मिळणार आहे कारण पंतप्रधान यांच्या माध्यमातून कार्यक्रम ठरवून 15 सप्टेंबरला मोठ्या रुपयांचा हप्ता वितरित केला जाणार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून, अनेक अटी काढून टाकल्याने प्रधानमंत्री आवास योजनेत जास्त नागरीक पात्र ठरणार आहे.
100 टक्के अनुदानावर फवारणी पंपाची पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर, जिल्हा निहाय यादी