खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकाचे कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अगदी तोंडावर आलेले पीक शेतकऱ्यांना हातातून गमवावे लागलेली होते, अशा स्थितीमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारचे अनुदान मिळणे अपेक्षित होते व अशाच आता शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन साठीचे दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये कापूस व सोयाबीनला अनुदान दिले जाणार आहे, व याचाच फायदा या वर्षी अनेक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, अनेक प्रकारच्या अटी व शर्ती यापूर्वी सोयाबीन व कापूस अनुदानामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या परंतु यातील पीक पाहणी केलेली असल्याची अट रद्द करण्यात आलेली आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर ज्या पिकांची नोंद होती त्यामध्ये जर कापूस व सोयाबीन या दोन पिकाची नोंद असेल तर अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे, मागील काही दिवसांमध्ये अधिसूचना जाहीर करण्यात आलेल्या होत्या व त्यानुसार याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्या याद्यांमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रे जमा करावी लागलेली आहे.
शेतकऱ्यांना प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान दिले जाईल म्हणजेच सोयाबीन साठी अनुदान दोन हेक्टर साठी हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दिले जाईल व कापसासाठी देखील याच प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान दिले जाईल म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे कापसाचे पीक दोन हेक्टर व सोयाबीनचे पीक दोन हेक्टर असे 2023 मध्ये होते असेल, अशा शेतकऱ्यांना एकूण 20 हजार रुपये मिळणार आहे, अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
पीएम जनधन योजनेला दहा वर्षे पूर्ण, बघा काय आहे योजनेचे फायदे