राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणीचा पंप दिला जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख देण्यात आलेली होती, परंतु त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले नसल्याने 14 ऑगस्ट हीच शेवटची तारीख देण्यात आलेली होती परंतु पुन्हा एकदा या तारखे मध्ये वाढ करण्यात आलेली असून 26 ऑगस्ट या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून हा फवारणी पंप 100% अनुदानावर दिला जाणार आहे. त्यामुळे जे शेतकरी बॅटरीवर चालणारा फवारणी पंप मिळवण्यासाठी इच्छुक असतील अशा शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध पात्रतेनुसार शेतकऱ्याची निवड केली जाईल म्हणजेच एक प्रकारे पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल, व त्या यादीनंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल व अशा शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागेल व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंपाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटीच्या वेबसाईटला ओपन करावे लागणार आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आधार कार्ड किंवा इतर प्रकारचे ऑप्शन वरून लॉगीन करून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्ज करा हे ऑप्शन निवडून कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनला निवडायचे आहे. त्यानंतर तपशील मध्ये स्वयंचलित यंत्र सिलेक्ट करा, त्यानंतर पीक संरक्षण अवजारे हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर बॅटरी संचलित फवारणी पंप त्यानंतर संपूर्ण अटी व शर्ती मान्य करायचे आहे व अर्ज सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व अर्जाची पावती सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 371 कोटी जमा, एवढे शेतकरी पात्र, 73 हजार शेतकरी ठरले अपात्र