राज्यातील विविध भागांमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीमध्ये अतीवृष्टी झाल्याने विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, त्याच पद्धतीने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सोयाबीनचे पीक धुळीस मिळालेले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अतिवृष्टी झाल्याने 25% अग्रीम पीक विमा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित केला जाईल यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळ पात्र करण्यात आलेली आहे, त्यामुळे अशा सर्व महसूल मंडळातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा वितरित केला जाईल.
अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांना वितरित केल्यानंतर शेतकऱ्यांचे जे पैसे सोयाबीन पिकांमध्ये खर्च झालेले असेल अशा प्रकारे, नुकसान शेती पिकाची वरून काढण्यास मदत होऊ शकते त्यामुळे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळणार आहे. याबाबत देण्यात आलेल्या निर्णयानुसार येथे एक महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन पिकाची 25% रक्कम म्हणजेच अग्रीम पीक विम्याचे रक्कम वितरित केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ मिळेल.
अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी ची महत्वाची बातमी असून यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळांमध्ये सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे, व याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून हा लाभ येत्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये मिळेल व शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीक विम्याची 25 टक्के एवढी रक्कम वितरित केली जाईल.