शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी शेती करत असताना मोठ्या प्रमाणात खते शेतकरी पिकाला देतात, खत देण्यामागचे उद्देश म्हणजे पिकाची चांगल्या प्रमाणात वाढ होऊन पिकाला धरलेल्या फळाची चांगल्या प्रमाणात वाढ व्हावी व जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यास शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतामध्ये खत पिकाला देत असतात, परंतु खते देत असताना बाजारामध्ये विविध प्रकारच्या खतात भेसळ होत आहे बनावट करून विकली जात आहे, त्यामुळे खत विकत घेत असताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, व डीएपी हे खत विकत घेताना कसे ओळखावे बनावट आहे की खरे आहे? ते याची अत्यंत सोपी ट्रिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
डीएपी खत बनावट आहे का? डीएपी खत बनावट आहे? की खरे आहे ही ओळखण्याची शेतकऱ्यांना ट्रिक माहिती असावी कारण डीएपी खत खूप महाग असून खत घेत असताना शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने पैसे द्यावे लागतात, परंतु या बदल्यात बनावट खत घेत असेल तर शेतकऱ्यांची केलेली मेहनत धुळीस मिळण्यास काहीही वेळ लागणार नाही, त्यामुळे तुम्ही जर डीएपी खत शेतीमध्ये वापरत असाल तर ते डीएपी खत बनावट आहे का हे ओळखण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा.
डीएपी खत हे तपकिरी काळा कलर सारखा असतो, व हे खत दाणेदार खत असते, डीएपी खताचे दाणे गरम केल्यानंतर फुगतात जर दाणे फुगले तर ते डीएपी चांगले आहे परंतु जर फुगले नाही तर ते बनावट आहे असे समजावे तसेच डीएपी खत नखाने कुस्करले तर कुस्करत नाही ते अत्यंत कुस्करण्यास अवजड जाते तसेच त्याचा गंध तीव्र असतो, अशा प्रकारच्या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी डीएपी खताची खरेदी करत असताना सावधगिरी बाळगावी, व खत बनावट आहे का हे आवश्यक रीतीने जाणून घ्यावे.
पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनो लगेच हे काम पूर्ण करा अन्यथा..