देशामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून ड्रोन दीदी अनुदान योजना राबवली जात आहे या योजनेची सुरुवात अगदी काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली असून देशातील महिला सक्षम व्हाव्या त्यांचे सक्षमीकरण होऊन स्वावलंबी बनाव या उद्देशाने शासनाने ड्रोन दीदी योजना राबवलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून महिलांना आठ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, त्यामुळे या योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र ठरतील आवश्यक कागदपत्रासह संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूया त्याच पद्धतीने या योजनेच्या माध्यमातून महिलांना अनुदानासोबतच प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे.
राज्यातील मोठ्या संख्येने महिलांना ड्रोन पुरवण्याचा उद्देश शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेला आहे योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन चालविण्याची प्रशिक्षण सुद्धा दिले जाईल, व ड्रोन खरेदीसाठी अनुदान तर दिले जाईलच त्यासोबत कर्ज देण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध असेल, शासनाच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी 80% म्हणजे जास्तीत जास्त आठ लाख रुपये पर्यंतचे अनुदान महिलांना दिले जाईल व हे अनुदान फक्त एकाच महिलेला मिळणार नसेल महिला बचत गटांना हे लाभ दिला जाणार आहे.
ड्रोन दीदी योजनेअंतर्गत लाभ घेत असताना महिलाही भारताची रहिवासी असावी बचत गटांमध्ये महिलेचे नाव असून स्वयंसहायता बचत गटाची सदस्य असणे आवश्यक, योजनेसाठी इच्छुक असणारी महिला वयोमर्यादेमध्ये पात्र असावी महिलेचे वय 18 ते 37 वर्षा दरम्यान असावे, महिलेला पंधरा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल व ड्रोन दीदी म्हणून जी महिला काम करेल अशा महिलेला पंधरा हजार रुपये एवढा पगार दिला जाईल, महिलेकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासवर्ड साईज फोटो, पासबुक, रहिवासी दाखला, बचत गटाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे असावी.