शासनाच्या माध्यमातून कृषी पदवीधर तसेच शेतकरी उत्पादक संस्था अशांना ड्रोन अनुदान देण्यासाठी योजना राबवली जात आहे, या योजनेच्या माध्यमातून अशा नागरिकांना ड्रोन अनुदान दिले जाते 22- 23 व 2023-24 या वार्षिक काळामध्ये ही अनुदान योजना राबवली गेलेली होती, व या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात आलेली होती, परंतु आता 2024-25 साठी ची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली असून महाडीबीटी फॉर्म र पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून अनुदानासाठी चा लाभ घेता येणार आहे.
याआधीही अनेक नागरिकांनी अर्ज केलेले होते परंतु अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने असल्याने या योजनेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही अत्यंत कमी अर्ज ड्रोन अनुदान योजनेसाठीचे प्राप्त झालेले होते परंतु आता महाडीबीटी फार्मर पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण या पर्यायांमध्ये ड्रोन अनुदानासाठीचा पर्याय उपलब्ध करून ड्रोन अनुदानासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे जे शेतकरी संस्था कृषी पदवीधर या ड्रोन अनुदानासाठी इच्छुक असतील अशांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
ड्रोन अनुदानासाठीचे अनुदान नेमके किती मिळणार व कोणत्या शेतकऱ्याला किती मिळणार हा मोठा प्रश्न आहे, त्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याला रकमेच्या 40 टक्के म्हणजेच 4 लाख रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाईल, तसेच वैयक्तिक शेतकरी त्यामध्ये महिला लहान शेतकरी यांना एकूण टक्केच्या 50 टक्के म्हणजेच पाच लाख रुपये एवढे अनुदान मिळेल. त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीला चार लाख रुपये पर्यंतच्या अनुदान दिले जाईल. महाडीबीटी फार्मर पोर्टल https://krishivibhag.com/mahadbt-drone-applications-started/# वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
सोयाबीनच्या दरात सुधारणा, बघा विविध बाजार समितीतील सोयाबीन दर