शेतकऱ्यांनो या तारखेपर्यंत लगेच ई-पीक पाहणी करा, अन्यथा पिक विमा व नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागणार | E Pik Pahani 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अनेक शेतकरी दरवर्षी पिक विमा भरतात, व महाराष्ट्रामध्ये एक रुपयात पीक विमा योजना चालू करण्यात आलेली असल्याने, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी लाभ नोंदवत आहे, परंतु पिक विमा योजना अंतर्गत नोंदणी केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या सातबारावर ऑनलाईन पद्धतीने आपल्या पिकांची नोंदणी करता येईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिक विमा मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ई पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोणत्या ठिकाणी लागवड केलेली आहे कोणते पीक घेतले जात आहेत, किती क्षेत्र कोणत्या पिकाने व्यापलेले आहे ही संपूर्ण माहिती सातबारावर नोंदवली जाते. 

 

त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने ई पिक पाहणी करता येणार आहे, ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पटवार्याकडे अन्यथा इतर कोणत्याही ठिकाणी न जाता घरबसल्या ई पिक पाहणी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून अन्यथा इतरांच्या मोबाईलवरून सुद्धा करता येणार आहे. ई पीक पाहणी करण्याची तारीख देण्यात आलेली असून 1 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी शेतकऱ्यांना करता येईल. संबंधित दिलेल्या तारखेदरम्यान शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना व्हर्जन ३.०.१ ॲप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या ॲपच्या द्वारे संपूर्ण माहिती भरून शेतकरी आपल्या शेतातून आपल्या पिकांची ई पीक पाहणी करू शकतात, शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या संकटाला सामोरे जावून विविध प्रकारचे संकट पिकावर येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा स्थितीमध्ये शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते तर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिकांसाठीचा पिक विमा वितरित केला जातो, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनाही पीक पाहणी करणे आवश्यक असणार आहे.

 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजना, लगेच अर्ज करा

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts