शेतकऱ्यांनो लगेच आपल्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद करा अशा पद्धतीने, बघा संपूर्ण प्रोसेस | E Pik Pahani 

खरीप हंगाम 2024 ची खरीप हंगाम 2024 ची ई पीक पाहणी 1 ऑगस्ट 2024 पासून चालू झालेली आहे, ई पिक पाहणी 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण शेतकऱ्यांना करावी लागणार आहे, शेतकरी अगदी आपल्या शेतातून आपल्या मोबाईल वरून सहजरीत्या आपल्या सातबारावर पिकाची नोंदणी करू शकणार आहेत त्यामुळे ई पिक पाहणी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची त्याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे देण्यात आलेली असून ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याचबरोबर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहे की ई पिक पाहणी करण्याची गरज नाही परंतु शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण ई पीक पाहणी द्वारा आपल्या पिकांची नोंदणी सातबारावर केली जाते. 

 

सोयाबीन व कापूस या दोन पिकाचा 2023 मधील खरीप हंगामातील अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे हे अनुदान दिले जाणार आहे, परंतु यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आवश्यक असणे गरजेचे नाही असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या सातबारावरच्या पिकांची नोंदणी असेल ते पीक ग्राह्य धरले जाणार आहे परंतु यावर्षी 2024 मध्ये सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी. ई पिक पाहणीमुळे एक प्रकारे पिकांना संरक्षण मिळते.

 

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन त्या ठिकाणी खालील प्रमाणे देण्यात आलेले नाव सर्च करा, E-Peek Pahani (DCS) आपल्या मोबाईल मध्ये तो ॲप इंस्टॉल करून घ्यावा, हवे असलेले परमिशन द्या व त्यानंतर उजव्या साईडला तीन वेळा सरकवून आपला विभाग निवडा. त्यामधील दुसरा पर्याय शेतकरी म्हणून लॉगिन करा हा निवडा, पुढे चार ते पाच ऑप्शन दाखवली जाईल त्यामधील एक ऑप्शन निवडून हवा तो ऑप्शन मधील माहिती भरा त्यानंतर तुम्हाला पुढे पाठवले जाईल, सांकेतांक तुम्हाला टाकावा लागेल सांकेतांक माहिती नसेल तर सांकेतांक विसरलात यावर जाऊन त्या ठिकाणी सांकेतांक मिळेल.

 

त्यानंतर सहा ऑप्शन दाखवल्या जातील त्यामधील पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन निवडावे, गट क्रमांक खाते क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरा एक पीक बहुपीक हे सुद्धा भरून त्यानंतर आपल्या शेतातील किती क्षेत्र कोणत्या ठिकाणी भरलेले आहे ते भरावे त्यानंतर आपल्या शेतामध्ये जाऊन पिकाचा फोटो काढावा व त्यानंतर पुन्हा एकदा माहिती चेक करून सबमिट करावे अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अत्यंत सहजरीत्या पूर्ण होणार आहे.

 

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत अर्ज सुरू, लगेच अशा पद्धतीने अर्ज पुर्ण करा

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts