शेतकरी आपल्या शेतीमध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात परंतु अशा विविध प्रकारच्या पिकांची लागवड केल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावर या पिकांची नोंद करून घेणे अत्यंत आवश्यक असते कारण शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेल्या नोंदणी नुसार अनेक वेळा शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे अनुदान सुद्धा दिले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना आता सातबारावर आपल्या शेतातील पिकाची नोंद करणे सुलभ व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातून ही पिक पाहनी उपलब्ध करून देण्यात आलेला असून याच्या द्वारा शेतकऱ्याला आपल्या शेतीमधून अगदी काही मिनिटातच पाहणी करता येणार आहे, आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, पण एक ऑगस्ट या तारखेपासूनई पीक पाहणी प्रक्रिया चालू झालेली आहे.
ई पीक पाहणी करण्याची मुदत देण्यात आलेली होती परंतु त्या कालावधीमध्ये काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी न केल्याने अशा शेतकऱ्यांना ई पाहणी करण्यासाठी वेळ मिळावा या कारणांनी शेतकऱ्यांना 23 ऑक्टोंबर ही तारीख देण्यात आलेली आहे व आता या 23 ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार आहे. पिक पाहणी करण्याचे अनेक प्रकारचे फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण इथे पाहणी केल्यानंतर शेतकऱ्याला आपल्या पिकाची नुकसानी झाली असेल तर क्लेम करता येतो तसेच मिळणारे अनुदान पिक पाहणी केले तर मिळते परंतु ई पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्याला अनुदानासह नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान अशा सर्व प्रकारच्या अनुदानापासून वंचीत रहावे लागू शकते.
ई पीक पाहणी करण्यासाठी नवीन ॲप ओपन झालेला ओपन करा त्यामध्ये महसूल विभाग, मोबाईल क्रमांक आपले शेतीमध्ये घेण्यात येणारी पिके व कोणते पीक किती क्षेत्रांमध्ये आहे ती माहिती शेतीला पाण्याची उपलब्धता आहे का ही सर्व माहिती भरून घ्यावी त्यानंतर पिकाचा फोटो काढून अपलोड करावा व अर्ज सबमिट करावा अशाप्रकारे शेतकऱ्यांना अत्यंत सहजरित पाहणी करता येणार आहे, जर शेतकऱ्यांनी पिक पाहणी केली नाही तर शेतकऱ्याला आपल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार करता येणार नाही, कारण तुम्ही कोणते पीक घेत आहात ही संपूर्ण प्रक्रिया येथील पिक पाहणी केल्यानंतर समोर येईल तसेच शासनाच्या सातबारावरील संबंधित काही योजना अशा योजनांचा सुद्धा लाभ घेता येणार नाही तसेच पीक कर्ज शेतकऱ्यांनी सातबारा विकास नोंदणी केली नाही तर ती कर्ज सुद्धा शेतकऱ्यांना घेता येणार नाही त्यामुळे ई पीक पाहनी करणे ही अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे.
तुरीवर आला मर रोग, शेतकऱ्यांनो लगेच तुरीवर मर रोगाचे अशा प्रकारे नियंत्रण करा अथवा तूर वाचणार नाही