मागील वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याचबरोबर शेतकऱ्यांना हवा असलेला योग्य दर विविध कारणांनी मिळालेला नसल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, कारण शेतीवर केलेला खर्च सुद्धा मागील वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांचा निघालेला नव्हता अशा स्थितीत शेतकऱ्यांना एक प्रकारचे सोयाबीन व कापसासाठीचे अनुदान देणे अपेक्षित होते व याबाबतीत शासनाच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनला दर मिळालेला नसल्याने पाच हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान देऊ अशा प्रकारचे सरकारने सांगितलेले होते व हे अनुदान शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येत आहे, सर्वात महत्त्वाची अट म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन अनुदान देण्यात येणार नव्हते परंतु आता नवीन देण्यात आलेल्या माहितीनुसार शासनाच्या माध्यमातून ई पिक पाहणीची अट रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनच्या अनुदान वितरित केले जाणारा असून या संबंधित प्रत्येक गावातील याद्या जाहीर झालेल्या असून ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे अशा शेतकऱ्यांची नाव याद्यांमध्ये असेल त्यामुळे यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील असे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अथवा जवळील सीएससी सेंटरच्या माध्यमातून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये अशा प्रकारचे अनुदान वितरित केले जाईल.