मागील काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवरून अनेक शेतकऱ्यांनी शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली व अशाच अर्ज प्रक्रियेला उत्तर म्हणून महाडीबीटीच्या माध्यमातून लॉटरी काढण्यात आलेली आहे व सोडत यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप मिळेल, राज्यामध्ये ही योजना राबवली जात असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के एवढे अनुदान फवारणी पंपासाठी दिले जाणार होते व हा फवारणी पंप बॅटरी संचलित असणार आहे.
कापूस सोयाबीन अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर प्रत्येक जिल्ह्यातून शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्यानंतर आता याची यादी जाहीर करण्यात आलेली असून प्रत्येक जिल्ह्यामधून अनेक नागरिकांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अनुदान दिले जाईल.
शेतीमध्ये कोणतेही पीक घेत असताना शेतकऱ्यांकडे फवारणी पंप आवश्यक असतो अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव पिकावर होत असल्याने अशा पिकांवर फवारण्या कराव्या लागतात, अशा फवारण्या करताना फवारणी पंप आवश्यक असल्याने शेतकरी फवारणी पंप विकत घेऊ शकत नाही त्यामुळे आता फवारणी पंप शेतकऱ्यांना खरेदीसाठी अनुदान वितरित केले जाईल.
यवतमाळ, अकोला, अमरावती, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड,बुलढाणा
यंदा कापसाला 10 हजाराचा दर मिळणार का? बघा अभ्यासकांचे मत काय?