शेती करत असताना विविध प्रकारच्या फवारणी शेतीतील पिकांवर कराव्या लागतात, अशा स्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांकडे फवारणी पंप नाही त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून आता अर्ज करून सर्वसामान्य शेतकऱ्याला बॅटरी ऑपरेटेड असलेला फवारणी पंप मिळवता येणार आहे व हा फवारणी पंप 100% एवढ्या अनुदानावर शेतकऱ्याला दिला जाणार आहे परंतु यासाठी अर्ज प्रक्रिया मात्र शेतकऱ्याला अत्यंत लवकरात लवकर करावी लागणार आहे, कारण यापूर्वी 30 जून ही तारीख शेवटची तारीख देण्यात आलेली होती यानंतरही तारीख बदलण्यात आलेली होती म्हणजेच शेतकऱ्यांना मुदतवाढ अर्ज करण्यासाठी दिलेली होती.
शेतकऱ्यांना पुन्हा मुदतवाढ अर्ज करण्यासाठीची देण्यात आलेली असून 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर जाऊन बॅटरी अपोरेटेड फवारणी पंपासाठी चा अर्ज पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळ दोन दिवस असून या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज करावा व विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी केलेले आहे त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप दिला जाईल.
अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की शेतकऱ्यांनी अर्ज तर केला परंतु सोडत यादी केव्हा लागणार सोडत यादी लागण्यासाठी किती वेळ लागेल तर याचे उत्तर म्हणून शेतकऱ्यांना तुम्ही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी जो अर्ज केलेला आहे व त्यातील पात्र शेतकऱ्यांची सोडत यादी ही येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे पाच ते सहा सप्टेंबर या तारखे दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठीची ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
शेतकऱ्यांनो लगेच आपल्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद करा अशा पद्धतीने, बघा संपूर्ण प्रोसे