राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शेतकरी हळदीची लागवड करतात, व यावर्षीचा हळद दराचा विचार करायचा झाल्यास हळदीला सुरुवातीपासूनच चांगला दर मिळत आहे, तसेच बाजार समितीमध्ये हळदीची आवक साधारणतः चांगली होत आहे व चांगला दर सुद्धा मिळत आहे परंतु दिवसेंदिवस मात्र आता हळदीच्या दरामध्ये घसरण होत आहे, कारण बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढत आहे, आणि शेतकरी बाजारात हळद विक्रीसाठी आणत आहे त्यामुळे आवक वाढलेल्या कारणाने हळदीचे दर थोडे घसरलेले आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी हळदीला बाजार समितीमध्ये 16 हजार रुपये एवढा दर प्रति क्विंटल प्रमाणे मिळत होता, परंतु आता थोड्या प्रमाणात बाजारांमध्ये हळदीची आवक वाढत असल्याने दरामध्ये थोडी घसरण होत आहे, शेतकरी चांगला दर आहे या कारणाने हळदीची विक्री करण्यास आणत आहे परंतु आता हळदीच्या दरात थोडी घट झाल्याने शेतकरी मात्र नाराज झालेले आहे कारण, अगदी तोंडावर आलेला घास विक्रीला नेताना दर कमी होणे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण परिस्थिती आहे.
बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल हळदीची आवक झालेली होती, अशा स्थितीमध्ये 14300 रुपये एवढा दर हळदीला मिळालेला आहे, हाच दर पूर्वी 16000 रुपये क्विंटल प्रमाणे होता. अनेक शेतकऱ्यांनी हळदीची काढणी झाल्यानंतर अजूनही दर वाढतील या कारणाने हळदीची साठवणूक केलेली होती, व सध्याच्या स्थितीमध्ये अनेक शेतकरी बाजार समितीमध्ये हळदीची विक्री करत आहेत अशा स्थितीमध्ये आता तेरा हजार शंभर ते पंधरा हजार पाचशे रुपये एवढा दर हळदीला मिळत आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती जाहीर, एवढ्या पदांची भरती लगेच या ठिकाणी अर्ज करा