गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलेली आहे, भाग बदलत हा पाऊस काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात चांगल्या स्वरूपाचा पडताना दिसतो, तसेच देशातील विविध भागांमध्ये दमट वातावरण बघायला मिळत आहे, व हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या नवीन अंदाजा नुसार काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली असून, येत्या काही तासातच विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो अशा प्रकारची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
31 जुलैपासून विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, त्यामध्ये राज्यस्थान, गोवा, मध्य प्रदेश, कोकण या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे. गुजरात सौराष्ट्र या भागांमध्ये रेड रेड अलर्ट वर्तवलेला आहे. एक तारखेला गुजरात, विदर्भ, मध्य प्रदेश उत्तराखंड या सर्व भागांमध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. राज्यस्थान व हिमाचल प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे.
काही भागांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली असून, त्यामध्ये त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, नागालँड तसेच झारखंड या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, कर्नाटक, किनारी कर्नाटक, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. अंदमान निकोबार बेट तसेच ओडिशा या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, अर्थातच सांगायचे झाल्यास मोठ्या भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा सर्वसामान्य नागरिकांना वर्तवण्यात आलेला आहे.