गेल्या आठवड्यापूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू होता परंतु आता सध्याच्या स्थितीमध्ये हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार राज्यामध्ये पावसाची उघडीप पडणार आहे, येत्या काही दिवसातच म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे मान्सून हा राज्यात अगदी काही दिवसाचा पाहुणा बनुन बसलेला आहे, तर हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता सुद्धा व्यक्त केलेली आहे.
दरवर्षी मान्सून परतीचा प्रवास हा 17 सप्टेंबर या तारखेच्या आसपास चालू होत असतो त्यामुळे यावर्षी साधारणतः 17 सप्टेंबर नंतर अगदी आठवडाभरामध्ये मान्सून परतीचा प्रवास चालू होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाच्या माध्यमातून वर्तवली जात आहे, केरळला मानसून आल्यानंतर आठ दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये तो पसरतो. तर पंधरा ऑक्टोंबर या तारखेपर्यंत मान्सून माघारी फिरत असतो, त्यामुळे यावर्षी सुद्धा मान्सून माघारी फिरण्याची वेळ अगदी जवळ येऊन पोहोचलेली आहे.
राज्यातील काही भागांमध्ये साधारणतः तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, त्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. येत्या आठवड्यामध्ये म्हणजेच 16 तारखेपासून विदर्भात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल, अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने विदर्भाला दिलेला आहे.
तसेच मान्सून परतीच्या पावसाचा विचार करायचा झाल्यास 19 ते 25 सप्टेंबर या कालावधी दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास चालू होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचा अंदाज पुणे वेधशाळेने दिलेला असून 27 सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू होऊन येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत राज्यातून मान्सून माघार घेईल, अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, त्यामुळे पुढील येत्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत पाऊस माघार घेईल.