राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता, या भागात होणार अतिवृष्टी, हवामान अभ्यासक पंजाब डख | Havaman Andaj 

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी राज्यातील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे, राज्या मध्ये पुढील दोन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, लातूर जिल्ह्यामध्ये अगदी विहिरी भरून वाहून चाललेल्या आहेत अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे व येत्या काही तासातच अजूनही राज्यातील विविध भागांमध्ये साधारण ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पंजाब डख यांनी वर्तवलेली आहे. व वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जवळपास पुढील चार दिवस म्हणजेच 27 तारखेपर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडू शकतो. 

 

26, 27 तारखेपर्यंत पूर्व विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे व येत्या काही तासापासूनच पुढील दोन ते चार दिवस हा जोरदार स्वरूपाचा पाऊस विविध भागांमध्ये पडेल, मराठवाड्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशा प्रकारची शक्यता असून सातारा, सांगली, सोलापूर, सिन्नर, नाशिक, नगर, पुणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, अशा या वरील जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

 

पुणे, नाशिक, मुंबई, कोकणपट्टी, मालेगाव, छत्रपती, संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोकण, अशा भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचे संकेत आहे. येत्या तीन दिवसांमध्ये यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, पुणे, नगर, सातारा, सांगली, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, जत, मिरर, कोकणपट्टी अशाप्रकारे जवळपास राज्यातील सर्व भागांमध्ये पुढील तीन दिवसात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल यामध्ये पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ या भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे.

 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार दोन लाख रुपये व्याज

Author

  • Sourav Kumar

    I am Sourav Kumar, from Maharastra. I have completed my graduation in political science and education. I write blog post and ar ticles on Indian Govt. schemes.

    View all posts