खरीप हंगाम 2023 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन अशा पिकांची लागवड केलेली होती, लागवडीनंतर अगदी काही दिवसातच मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीने पिकांपासून कमी उत्पादन मिळू शकले, अनेक ठिकाणी सोयाबीन सारखी पिके उभीच वाळून गेलेली होती, तसेच मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीन सारख्या पिकांचे नुकसान झालेले होते, अशा स्थितीमध्ये सोयाबीन व कापूस अशा पिकांना कोणत्याही प्रकारे चांगला दर म्हणजेच बाजार भाव मिळालेला नसल्याने अशा शेतकऱ्यांनी शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघालेला नाही.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत मिळणे अपेक्षित होते, व त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला असल्याने, शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येणार असून दोन हेक्टर पर्यंतची यामध्ये मर्यादा राहणार आहे, यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रक्रिया सुद्धा स्पष्ट करण्यात आलेली आहे, व त्यानुसार शेतकऱ्यांना संमती पत्र कृषी विभागांमध्ये जमा करायचे आहे.
शेतकऱ्यांना कृषी विभागामध्ये जाऊन वरील प्रमाणे देण्यात आलेले संमती पत्र, शेतकऱ्यांना त्याची प्रिंट काढून विचारले गेलेले संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागणार आहे, तसेच गावांमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या असल्याने त्यामध्ये कापूस व सोयाबीन पिकासाठीच्या शेतकऱ्यांसाठी झालेल्या आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी कापसासाठी व सोयाबीनसाठीचे अर्ज कृषी विभागामध्ये जाऊन जमा करावे त्यानंतरच शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये प्रमाणे मदत दिली जाईल.