खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन या पिकांचे कमी पावसामुळे अति प्रमाणात नुकसान झालेले असल्याने अशा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता व आता या निर्णयाची पूर्ती करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे येत्या काही दिवसातच वितरित करण्यात येणार असून याची तारीख सुद्धा ठरवण्यात आलेली आहे, त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ठरणार आहे.
येत्या 29 सप्टेंबर रोजी रविवारला शासनाच्या माध्यमातून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे पैशाचे वितरण केले जाणार असून, ज्या शेतकऱ्यांची कापूस व सोयाबीन ही दोन्ही पिके दोन दोन हेक्टर प्रमाणे असतील तर एकूण वीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील व कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा आहे. मुंबई या ठिकाणी कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 हजार 690 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे.
यामध्ये ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल व ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचे वितरण केले जाईल, कारण केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांना राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालेला असेल अशांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचे वितरण होईल परंतु ज्या शेतकऱ्यांची मागील वर्षीचे कापूस व सोयाबीन हे पीक होते अशा शेतकऱ्यांची केवायसी नसल्यास त्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी. विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संख्येनुसार पैशाचे वितरण केले जाणार आहे.
पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला जमा होणार, ही तारीख फिक्स