देशामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ घेता येतो व एक प्रकारे आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतर आपली शेती योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना प्रगत करून जास्तीत जास्त उत्पादन काढता येते, अशाच प्रकारची एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना ही योजना आता इतर पाच राज्यांत सुद्धा लागू करण्या ची घोषणा करण्यात आलेली आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरूच आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पमुदतीसाठी एक प्रकारे कर्ज दिले जाते, तसेच त्या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध होऊन जी कोणती पैशाची अडचण असेल त्या पैशाच्या अडचणीला भागवून शेतकरी आपली शेती प्रगत करू शकतो, किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही कशी अनेक कारणे आहे, त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत लाभार्थी कोण आहे हे सुद्धा जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांनी पूर्वी कर्ज घेतलेले असेल म्हणजेच इतर ठिकाणाहून कर्ज घेतलेले असेल तर किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्यांना अडचणी जाणार आहे, 18 ते 75 या वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपये पर्यंत कोणत्याही सुरक्षा ठेवी शिवाय कर्ज दिले जाते. योजना अंतर्गत 7 टक्के दराने व्याजदर आकारला जाईल.
कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठीचा सुरक्षा विमा सुद्धा योजनेच्या अंतर्गत लागू केला जाईल, किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. अशाप्रकारे ज्या शेतकऱ्यांनी इतरत्र बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेले असेल व कर्ज थकित असेल तर किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेणे सहज शक्य होणार नाही.
कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला बजेट