राज्य शासनाच्या माध्यमातून माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र मध्ये चालू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महिन्याला शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन दिले जाणार असून, या योजनेअंतर्गत जिल्हा उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक असतील अशांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी असून अर्ज करत असताना जी आवश्यक कागदपत्रे उमेदवाराकडे उपलब्ध हवी असेल ती कागदपत्रे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, माझा लाडका भाऊ योजना अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या असल्याने अशा बेरोजगार तरुणांना एक प्रकारे व्यवसाय प्राप्त व्हावा, त्यांची बेरोजगारी संपवावी या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत बारावी पास डिप्लोमा धारक तसेच पदवीधारकांना विद्यावेतन दिले जाणार आहे, बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्याला सहा हजार रुपये महिना, डिप्लोमा धारकाला आठ हजार रुपये, पदवीधरकाला दहा हजार रुपये प्रति महिना अशा प्रकारचा रोजगार सहा महिने शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिला जाईल.
सहा महिने एवढा रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर म्हणजेच प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे, व प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घेऊन इतरत्र ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्याला नोकरी प्राप्त होऊ शकणार आहे, त्यामुळे अर्ज करत असताना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक पात्रतेमध्ये बारावीची मार्कशीट डिप्लोमा तसेच पदवीची वार्षिक अशा प्रकारच्या कागदपत्रांबरोबरच, रिझ्युम सुद्धा विद्यार्थ्याकडे असायला हवा. अशाप्रकारे वरील दिलेली कागदपत्रे विद्यार्थ्याकडे उपलब्ध असावी.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकलेला असेल तर, लगेच अशा पद्धतीने एडिट करून चुका दुरुस्त करा